Site icon सक्रिय न्यूज

सर्पदंशाने चिमुकल्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू…..!

सर्पदंशाने चिमुकल्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू…..!
किल्लेधारुर दि.२४ – धारूर तालुक्यातील कोयाळ या गावात सर्पदंशामुळे एकाच कुटुंबातील सख्ख्या भाऊ व बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सदर घटना २३ मे रोजी मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी घडली. काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे कुटुंबासह अख्खे गाव शोकमग्न आहे.
              प्रदीप मधुकर मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला. या सापाने  दोघांनाही दंश केला. दंशानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत बिघडली. तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांनीही प्राण सोडले होते. या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली असून, मुंडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
                 दरम्यान एकाच घरातील दोन निष्पाप चिमुकल्यांना गमवावे लागल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेअर करा
Exit mobile version