Site icon सक्रिय न्यूज

माजी पं. स. उपसभापती नारायण घुले यांचे अपघाती निधन….!

माजी पं. स. उपसभापती नारायण घुले यांचे अपघाती निधन….!

Oplus_16908288

केज दि.३ – तालुक्यातील राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व तथा केज पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायणराव घुले यांचे अपघाती निधन झाले आहे.                     तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी नारायण कुंडलिक घुले हे राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील एक परिचित व्यक्तिमत्व होते. मागच्या काही वर्षांपूर्वी ते केज पंचायत समितीचे उपसभापती तर टाकळी गावचे सरपंच म्हणूनही राहिलेले आहेत. तर शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातूनही ते शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होते. मात्र मंगळवारी सायंकाळी (दि.३ जून)  ते बीड रोडवर असलेल्या त्यांच्या घरी जात असताना बीड कडून येणाऱ्या एका चार चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरील अपघात केज शहरातील बीड रोडवरील शिक्षक कॉलनी ते बीएसएनएल ऑफिस दरम्यान झाला.
शेअर करा
Exit mobile version