केज दि.५ – एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा घेतली तर ती पूर्णत्वास गेली पाहिजे. केवळ आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी बोलायचं अन पुन्हा पद्धतशीरपणे विसरायचं हे अनेकदा पहावयास मिळते. मात्र केजच्या मुंदडा समर्थक सुनील घोळवे यांनी नवसही केला आणि पूर्णही केला त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठपणावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नवस किंवा प्रतिज्ञा करणे म्हणजे प्रामाणिकपणे वचन देणे. अनेकजण देव, स्वामी किंवा अन्य धार्मिक ठिकाणी नवस करतात. नवस बोलताना, आपण आपल्या अडचणी, इच्छा किंवा समस्या व्यक्त करतो आणि त्या पूर्ण झाल्यावर एक विशिष्ट प्रकारची दान ईश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन देण्याचे वचन देतो. नवस पूर्ण झाल्यावर फेडतो म्हणजे आपले वचन पाळतो. असाच नवस मुंदडा परिवाराचे कट्टर समर्थक सुनील घोळवे यांनी नमिता मुंदडा या आमदार व्हाव्यात यासाठी केला होता. त्यांनी स्वतः चे सौंदर्य तिरुपती बालाजी चरणी अपर्ण करण्याचा नवस बोलला होता. आणि नमिता मुंदडा आमदार झाल्याही. मात्र काही घरगुती कारणामुळे त्यांना नवस फेडायाला वेळ लागला. परंतु ४ जुन रोजी घोळवे यांनी सहपरिवार तिरुपती बालाजी येथे केशवपन करून आपला नवस फेडला.
दरम्यान, आपला नवस फेडताना त्यांनी सांगितले की, नवस फेडल्याने आपले मन शांत आणि प्रसन्न झाले. मनातून प्रतिज्ञा केलेल्या स्वीकारल्या जातात.
नवस फेडल्याने देवाची कृपा आपल्यावर राहते आणि समस्या दूर होतात.एवढेच नव्हे तर नवस फेडल्याने आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

