Site icon सक्रिय न्यूज

अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावून करत होता आपले उखळ पांढरे……!

पुणे | कोण कधी कोणत्या गोष्टी चा गैरफायदा घेईल हे सांगता येत नाही.संकतातही संधी शोधणारे महाभाग आपल्या कार्यभाग उरकून मोकळे होतात. तर आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरताना दिसतात. खंडणी व आम्लपदार्थ विरोधी पथकाने पुण्यातील फुरसुंगीजवळ एक टेम्पो पकडला असून तंबाखू, गुटख्याचा 10 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावून त्यातून बेकायदेशीर रित्या तंबाखू व गुटखा या मालाची वाहतूक करण्यात येत असल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली तेव्हा त्यात तंबाखू व गुटखा यांचा 9 लाख 14 हजार रुपयांचा माल असल्याचे आढळून आला. पोलिसांनी टेम्पोसह 12 लाख 14 हजार 529 रुपयांचा माल जप्त केला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकातील प्रसाद टिळेकर आणि अमोल पिलाणे यांना भेकराईमधील दोघे टेम्पोमधून गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार त्यांनी सापळा लावला आणि तंबाखू व गुटख्याची बेकायदेशीर केली जाणारी वाहतूक थांबवून संपूर्ण माल जप्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील मंदार राजेंद्र ठोसर आणि मनोज सुमतीलाल दुगड या दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

शेअर करा
Exit mobile version