Site icon सक्रिय न्यूज

पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना….!

पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना….!

पुणे दि.१५ – कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडल्यानंतर आता बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम याठिकाणी दाखल झालेली होती. या दुर्घटनेत 20 ते 25 पर्यटक नागरिक वाहून गेलेले आहेत. तर 3 पर्यटकांना आपला जीव गमावला लागला आहे. वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू होतं. मात्र आता बचावकार्य लवकरात लवकर होणं गरजेचं होतं. मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने व अंधार पडल्याने एनडीआरएफच्या टीमला बचाव कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.

           दरम्यान, सदरील पूल अतिशय जीर्ण झालेला असून नव्याने बांधणीचे टेंडर निघाले होते. परंतु पर्यटकांना पुलावर जाण्यासाठी बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर पर्यटक तिथे जमले आणि ओव्हर लोड होऊन पूल कोसळल्याची माहिती मिळत आहे.
शेअर करा
Exit mobile version