केज दि.२१ -फूस लावून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर बार्शी इथं बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदरील मुलीला लातूर येथून फूस लावून पळवले होते.
एका कुटुंबाचा विश्वास संपादन करून घरी राहायला आलेल्या एका महिलेने पीडितेचे अपहरण केले होते. अपहरणाच्या महिनाभराच्या काळात पुणे, मुरुड, बार्शी अशा अनेक ठिकाणी पीडितेला ठेवण्यात आले होते.मात्र बार्शी येथील लॉजवर लॉज मालकानेच पीडितेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडितेने आपली सुटका करून घेऊन लातूर गाठले. त्यानंतर ही घटना समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेत आरोपी लॉज मालकाला बार्शी येथून अटक केली आहे. तर अन्य दोघे जण फरार आहेत.पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

