केज दि. ९ – मेडिकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बीड व साई सूर्या डायग्नोस्टिक केज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केज येथे करण्यात आले आहे.
रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी किडनी सुपर स्पेशालिटी डॉक्टर अजित घोडके आपल्या केज मध्ये रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये मुतखड्यांचे व प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, रक्तामधील युरिया व क्रिया टिनिन, उच्च रक्तदाब व डायबिटीस, डायलिसिस, डायलिसिस कॅथेटर, किडनी प्रत्यारोपण उपचार, क्रिटिकल केअर नेफ्रॉलॉजी, किडनीचे बायोप्सीद्वारे निदान तसेच सर्पदंश व विषबाधा संबंधी डायलिसिस उपचार करण्यात येणार आहेत. शिबीराचा लाभ घेण्यासाठी पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक असून रुग्णांनी सोबत येताना आधीचे रिपोर्ट व फाईल सोबत घेऊन येणे गरजेचे आहे. दरम्यान किडनी सुपर स्पेशलिटी डॉक्टर अजित घोडके यांच्या उपस्थितीमध्ये सर्व रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे गरजू रुग्णांनी कानडी रोडवरील साई सूर्या डायग्नोस्टिक क्लिनिक या ठिकाणी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

