Site icon सक्रिय न्यूज

रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करावे लागेल….!

रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करावे लागेल….!
केज दि.२१ – गणेश उत्सवाच्या अगोदर तात्काळ रस्ता दुरुस्ती व पोल वरील पथदीवे दुरुस्ती करण्याची मागणी शनी मंदिर परिसरातील नागरिकांनी नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली असून तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
                 केज शहरातील वार्ड क्रमांक १३ मधील मंगळवार पेठ कॉर्नर, शनि मंदिर ते श्रीराम मंदीर हा रस्ता अत्यंत खराब असून मोठ मोठे खडे पडलेले आहेत. हा रस्ता जुन्या गावाला जोडनारा अत्यंत महत्वाचा रस्ता असून हा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब असल्याने नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे संबंधीत यंत्रणेला आपल्या स्वरावरून सदरील रस्ता तातकाळ दुरुस्त करण्यासाठी निर्देशित करून नागरीकांना दिलासा देण्यात यावा.तसेच गणेश उत्सवाच्या अगोदर रस्ता दुरुस्त करावा अन्यथा शनी प्रतीष्ठाण मार्फत नगरपंचायत समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
         निवेदनावर सचिन रोडे, राम डुकरे, बालु शिंदे, अक्षय इकरे, संतोष सत्वधर, किशोर अगरकर, संजय गाढवे, बापु सत्वधर, नंदु सत्वधर, भागवत अगरकर, ऋषिकेश गाढवे, रवी डुकरे, बबलु गायके, भुजंग सूळके
विजय वाकळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेअर करा
Exit mobile version