Site icon सक्रिय न्यूज

आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलनासाठी परवानगी….!

आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलनासाठी परवानगी….!
मुंबई दि.२७ – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना अखेर मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी फक्त एका दिवसापुरतीच असून, सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच आंदोलन करता येणार आहे. परंतु हि परवानगी देत असतांना मुंबई पोलिसानी काही अटी घातल्या आहेत.
 अशा आहेत अटी…..!
एका वेळी फक्त 5 हजार आंदोलकांनाच सहभागी होता येईल.आझाद मैदानासाठी 7 हजार चौ. मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे.सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार-रविवारी आंदोलन करता येणार नाही. आंदोलकांच्या वाहनांना आझाद मैदानात प्रवेश नसेल, फक्त नेत्यांसोबत 5 गाड्यांनाच परवानगी असेल. परवानगीशिवाय माईक, स्पीकर किंवा गोंगाट करणारी साधने वापरता येणार नाहीत. मोर्चा काढण्यास बंदी. आंदोलनस्थळी स्वयंपाक, कचरा टाकणे किंवा शिस्तभंग करणारे वर्तन करता येणार नाही. लहान मुले, गरोदर महिला आणि वृद्धांना आंदोलनात सहभागी करू नये. गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा किंवा नागरिकांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
         दरम्यान, याआधी पोलिसांनी परवानगी नाकारली होती, परंतु आता अटींसह परवानगी दिल्याने मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
शेअर करा
Exit mobile version