Site icon सक्रिय न्यूज

प्रा.लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत केज येथे ओबीसी बांधवांच्या बैठकीचे आयोजन…!

प्रा.लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत केज येथे ओबीसी बांधवांच्या बैठकीचे आयोजन…!

Oplus_16908288

केज दि.६ – तालुक्यातील ओबीसी बांधवांची बैठक व पत्रकार परिषद प्रा. लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रविवार रोजी दुपारी ४ वाजता शासकीय विश्राम गृह केज येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
        प्रा. लक्ष्मण हाके ओबीसीच्या न्याय हक्क आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढलेल्या नवीन शासन आदेशामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ओबीसी घटकांनी याविरोधात आंदोलने आणि कायदेशीर लढा देण्याची गरज आहे. यासाठी लक्ष्मण हाके यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर हा ओबीसी आरक्षण संपविणारा ‘काळा कागद’ आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली बोगस प्रमाणपत्रे काढून ओबीसींचे हक्क हिसकावले जात आहेत अशी भीती निर्माण झाली आहे.याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘ओबीसींचे आरक्षण ओबीसींनाच राहिले पाहिजे. हे भांडण लावणारे शासन आहे. जबरदस्तीने दिलेले आरक्षण आहे. त्यासाठी मोठी लढाई लढावी लागेल, रस्त्यावर उतरावे लागेल.’
         दरम्यान, आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी संबंध महाराष्ट्रात प्रा.लक्ष्मण हाके बैठका घेत आहेत. त्याच अनुषंगाने बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामगृह केज येथे केले आहे तरी सर्व ओबीसी बांधवांनी दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version