Site icon सक्रिय न्यूज

शिक्षक कॉलनी गणेश मंडळाने जपला सांस्कृतीक वारसा……!

शिक्षक कॉलनी गणेश मंडळाने जपला सांस्कृतीक वारसा……!

Oplus_16908288

केज दि.८ – शहरातील शिक्षक कॉलनी, बीड रोड केज येथे राहुल प्रतिष्ठान आयोजित पारंपरिक मानाचा गणेश मंडळाचा गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने व एकजुटीने साजरा करण्यात आला.‌ महाराष्ट्रातील संस्कृतीचे जतन करून कुठलाही धांगडधिंगा न करता व गणेश उत्सवाचे पावित्र्य राखून राहुल प्रतिष्ठान शिक्षक कॉलनी केज ने एक आदर्श निर्माण केला आहे.
               दहा दिवस चालणाऱ्या उत्सवात पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना करून, रोज सकाळ संध्याकाळी श्री. व सौ. यांच्या हस्ते आरती करण्यात आली. महिला भजनी मंडळ, काकड आरती, व विविध प्रकारचे भजन, गाणी, महिला भजनी मंडळींनी एकत्र येत गणेश उत्सवाची परंपरा जपून युवकांना आदर्श घालून दिला.
            तसेच केज पोलिस ठाण्याचे कृतव्यदक्ष पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवने, गटनेते हारुणभाई इनामदार, माजी सभापती विष्णू घुले, नगराध्यक्षा  सिताताई बनसोड, नगरसेवक सुग्रीव कराड, शिवाजी हजारे, शिवाजी घुले, लक्ष्मण जाधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राहुल प्रतिष्ठानच्या गणेश उत्सवात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या.
                    विसर्जनाच्या दिवशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीमध्ये महिला मंडळींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवली. तसेच राहुल प्रतिष्ठान च्या वतीने महाप्रसादाचेही आयोजनही करण्यात आले होते.
शेअर करा
Exit mobile version