Site icon सक्रिय न्यूज

युवानेते विष्णू घुलेंनी बांधावर जाऊन नुकसानीची केली पाहणी….! 

युवानेते विष्णू घुलेंनी बांधावर जाऊन नुकसानीची केली पाहणी….! 
केज दि.२३ – तालुक्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने शेतात पाण्याचे तळे साचल्याने सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मंगळवारी केज पंचायत समितीचे भाजपचे युवा नेते विष्णू घुले यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
            मागील आठवड्यापासून सतत पावसाचा जोर वाढला आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने नदी काठच्या जमिनी पिकांसह वाहून गेल्या आहेत. तर शेतात पाणी साचल्याने पाण्याचे तळे साचले आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलेली शेतकरी वर्ग हताश झाला आहे. मंगळवारी केज पंचायत समितीचे माजी सभापती विष्णू घुले यांनी डोणगाव, शिरपुरा शिवारात चिखल तुडवत बांधावर नुकसानीची पाहणी करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
                दरम्यान,  प्रशासनाने तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे सरगट पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी ही विष्णू घुले यांनी केली. यावेळी कोरेगावचे तलाठी जी. डी. नादरगे, टाकळीचे तलाठी कुथवाडे यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version