केज दि.२५ – तालुक्यातील होळ व बनसारोळा महसूल मंडळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे असून शासनाने तात्काळ दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी अशी मागणी होत आहे.
केज तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने होत्याचे नव्हते झाले. कित्येक कुटुंब रस्त्यावर आले, शेतकऱ्यांनाचे नुकसान तर पूर्णपणे झाले.त्यामुळे तात्काळ मदतीसह पीकविमा लागु करण्यात यावा अशी मागणी तहसीलदार केज यांच्याकडे युवानेते संग्राम शिंदे,ऍड. राजेश शिंदे, सुनील देशमुख यांनी केली असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरीही उपस्थित होते.

