केज दि.१६ – स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झालेली आहे. अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहे मात्र ज्या त्या सर्कलमध्ये आणि गणांमध्ये मतदारांनीच आपल्या काही प्रतिनिधींना मनात ठेवलेले आहे आणि ते आपले प्रतिनिधी व्हावेत अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. आणि यापैकीच विडा सर्कल मध्येही एक नाव प्रकर्षाने चर्चेत आले असून ते आहे जयश्रीताई शरद गदळे.
विडा सर्कलमध्ये आतापर्यंत अनेक मातब्बर उमेदवारांनी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केलेले आहे. मात्र म्हणावा तेवढा विकास त्या सर्कलचा झालेला नाही. सदरील सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणावर डोंगराळ भाग आहे आणि बहुतांशी लोक हे ऊसतोड मजूर म्हणून काम करत आहेत. अल्पशा जमिनीवर इतर वेळी ते उपजीविका भागवतात. मात्र त्यांच्यासाठी ज्या काही योजना आल्या पाहिजेत, त्यांचं जीवनमान उंचवावं यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या आतापर्यंत झालेल्या नाहीत. मात्र याच गोष्टींचा विचार डोक्यात घेऊन उच्चशिक्षित असलेल्या जयश्रीताई शरद गदळे ह्या प्रतिनिधित्व करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जयश्रीताई गदळे ह्या एक उच्च शिक्षित आणि एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून काम करतात. शिक्षण महर्षी शामराव गदळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांचे पती शरद गदळे यांच्यासोबत त्या शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये नेहमी नवनवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांना अपडेट ठेवण्याचे काम जयश्रीताई मागच्या अनेक वर्षांपासून करत आहेत. स्वतः ग्रामीण भागात असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्याची पुरेपूर जाण त्यांना असून यांच्यासाठी आपण काहीतरी करावं अशी तळमळ त्यांची दिसून येते.
विडा सर्कल हे महिलेसाठी आरक्षित असल्याने सर्कलमधील गावागावातील लोक जयश्रीताई सारख्या उच्चशिक्षित आणि सर्व क्षेत्रातील जाण असणाऱ्या एका महिलेला आपला प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचे बोलत आहेत. जयश्री ताईंना जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करतील अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत.
दरम्यान जयश्रीताई यांना शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राचा वारसा जसा लाभलेला आहे तसाच ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांची उकल करण्याचा त्यांचा माणस त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो. त्यामुळे जयश्रीताई विडा सर्कलच्या प्रबळ दावेदार ठरत आहेत.

