केज दि.२२ – स्वर्गीय बाबुरावजी आडसकर यांनी सुरू केलेली दिवाळी पाडव्याची परंपरा जेष्ठ नेते रमेश आडसकर यांनी कायम ठेवली आहे. आजही (दि.२२) आडस येथे दिवाळी पाडव्यानिमित्त स्नेहमिलन झाले यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी रमेश आडसकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची दखल घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करत आहोत, असे मत व्यक्त केले.
सामाजिक सलोखा जपण्यासाठी व अठरापगड जातींना एकत्र घेऊन जाण्याचा वारसा पुढे नेण्यासाठी दीपावली पाडवा निमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार संजय दौंड, राजेश्वर चव्हाण (जि.अ.रा.कॉ.), दत्ता आबा पाटील (उपाध्यक्ष, अंबा साखर ), राज किशोर पापा मोदी, अंकुशराव इंगळे (सभापती, कृ.उ.बा. समिती), जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे, हनुमंत मोरे, हारूनभाई इनामदार ( जनविकास आघाडी), राजाभाऊ औताडे, नगराध्यक्षा सिताताई बनसोड, इश्वर मुंडे, भगवान केदार, संतोष सोनवणे, राहुल भैय्या सोनवणे,
बबन लोमटे, किसन कदम,अमर पाटील, राजू इनामदार,अजहर इनामदार, कैलास पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान, स्नेहमेळावा पार पडल्यानंतर सर्व मान्यवरांनी रमेशराव आडसकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

