Site icon सक्रिय न्यूज

खा.रजनीताई पाटील यांची कवडगाव येथे भेट….!

खा.रजनीताई पाटील यांची कवडगाव येथे भेट….!

वडवणी दि.२७ –  तालुक्यातील कवडगाव येथील डॉ.संपदा मुंडे यांच्या घरी  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा.सौ.रजनीताई पाटील यांनी भेट देऊन कुटूबियांना आधार दिला. तसेच एसआयटी स्थापन करुन लवकरात लवकर तपास करण्यात येईल आणि एवढेच नव्हे तर राज्यसभेत हा प्रश्न उपस्थित करुन न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी उपस्थित माजी मंत्री अनिस अहमद,काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे,दादासाहेब मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

शेअर करा
Exit mobile version