Site icon सक्रिय न्यूज

श्री क्षेत्र कपिलधार महापदयात्रेतील भाविक भक्तांची केजकरांनी केली सेवा….!

श्री क्षेत्र कपिलधार महापदयात्रेतील भाविक भक्तांची केजकरांनी केली सेवा….!
केज दि.५ – संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी महाराज दिंडी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांची चहा, अल्पोपहार, भोजन सेवा, आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप सेवा कार्याचे आयोजन मन्मथ माऊली सेवा प्रतिष्ठान व्यापारी महासंघ व भगवान श्रीकृष्ण आश्रम केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले.
              याप्रसंगी श्री शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळ, श्री सद्गुरु राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, श्री सद्गुरु संगण बसवस्वामी निलंगा यांनी आशीर्वचन केले व आयोजकांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये
डॉ. स्वाती मुळे, डॉ. सुषमा शेटे, डॉ.आशिष मुळे, डॉ. वैजनाथ शेटे, डॉ.प्रगती सावंत ,डॉ मृणाल तांबारे यांनी रुग्ण तपासणी केली व फार्मासिस्ट शिवम वाळके, अश्विनी बावगे,अशोक काळे,अविनाश नेमटे, राजेश तपसे यांनी औषधी वाटप केले.
               दरम्यान, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मन्मथ माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. वैजनाथ शेटे, सचिव उमाकांत बोधने, सुनील धारेकर, दिपक मिटकरी  ,निलेश मुळे, चंद्रशेखर शेटे , भीमाशंकर तोंडसे, राजकुमार गंधगे,  संतोष गिराम, ओंकार शेटे, सोहम बोधने,योगेश काळे, रामभाऊ मुळे दिलीप चौरे,अनिल हिरे,महादेव मोरे सौ.सुनीता बोधने, सुचिता शेटे,भगवान श्रीकृष्ण आश्रम प्रमुख श्री.केशव महाराज शास्त्री व सहकारी आणि व्यापारी महासंघाचे सुहास चिद्रवार, अतुल मिटकरी, विकास मिरगणे ,दादा जमाले, आनंद वडगावकर,गोविंद जाजु व गिरिराज कलेक्शन टीम यांनी परिश्रम घेतले.
शेअर करा
Exit mobile version