Site icon सक्रिय न्यूज

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..!

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..!
केज दि.६ – मराठा सेवा संघाच्या वतीने ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम केज येथे
दि ७ डिसेंबर  रोजी सकाळी १०.३० वाजता गटसाधन केंद्र केज येथे होणार आहे.
                   कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे असणार आहेत. यावेळी महादेवी फुलसुरे, मोहन ढाकणे, व्यंकट चव्हाण, संध्याराणी कोल्हे, सुरेखा मोराळे, नवनाथ घुगे, रेखा धेंडे, संगीता नवले – नाईकवाडे, नितीन हावळे ,स्वाती वरपे, बाबुराव तांबडे ,बालासाहेब लोखंडे, आश्रुबा गायकवाड, पुंडलिक पोपळघाट, शामल जाधव या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे
                कार्यक्रमास डॉ.अशोक थोरात संचालक, आरोग्य विमा महामंडळ, महाराष्ट्र राज्य
तहसीलदार राकेश गिड्डे, शैलेश फडसे  मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड नगरपरिषद यांच्यासह जी.बी गदळे, नागनाथ जाधव, डॉ. भाऊसाहेब चाळक, दत्तात्रय चाटे, हनुमंत भोसले,हनुमंत घाडगे, डॉ.हनुमंत सौदागर, जनार्धन सोनवणे, शिवाजी ठोंबरे,  विनोद शिंदे, गोविंद शिनगारे,
राहुल खोडसे, यांची उपस्थिती लाभणार आहे.
        सदरील पुरस्कार वितरण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघ शाखा केजच्या वतीने करण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version