दिवसभरातील प्रमुख घडामोडी
???? १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीमध्ये चीनचे ३०-४० नव्हे तर तब्बल ६० सैनिक मारले गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. या संघर्षात भारताच्याही २० जवानांना वीरमरण आले होते.
???? आजपासून राज्य परिवहन मंडळांच्या बसेसची आंतरराज्य प्रवासी सेवा सुरू होणार आहे. सध्या एसटीची राज्यांतर्गत सेवा सुरू झाली आहे. सध्या एका सीटवर एकच प्रवासी बसण्याची अनुमती आहे.
???? जगातील सर्वात मोठी e-commerce कंपनी एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. सोमवारी अमेझॉनने याविषयी घोषणा केली. Amazon.com ने याविषयी माहिती देताना सांगितलं की, लवकरच ऑनलाईन ऑर्डरच्या वितरणावर कंपनी नव्याने काम करणार असून 1 लाख लोकांसाठी रोजगार देखील निर्माण करणार आहे.
???? महाराष्ट्रावर येऊ घातलेलं संकट आहे त्यासाठी राज ठाकरे असतील किंवा ज्यांना या महाराष्ट्रावर प्रेम आहे सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे, यासाठी माझं सगळ्यांशी बोलणं सुरु आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मांडलं आहे. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा राज ठाकरेंना साद घातल्याचं दिसून येत आहे.
???? देशात कोरोना संसर्ग वाढत असताना काहीशी दिलासादायक बातमी आहे.स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सीन या लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. भारत बायोटेकने यासंदर्भात माहिती दिली आहे.
???? दक्षिण गुजरातची किनारपट्टी ते उत्तर कर्नाटक आणि उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. यामुळे आठवडाभर राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
???? मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारतेय. सोमवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 7 इतका नोंदला गेलाय. अनलॉक 4 सुरू झाला असला तरी मुंबईत गेल्या दोन दिवसांपाससून हवा सुटली असल्यानं हवेची गुणवत्ता टिकून असल्याचे दिसते.
???? अनेक तरुणींचा लैंगिक शोषण करणाऱ्या आणि नऊ जणींना फूस लावून पळवणाऱ्या कुख्यात लव्हगुरूला दिल्ली पोलिसांच्या क्राइमब्रँच आणि इंटरस्टेट सेलने अटक केली आहे. हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील बद्दी येथून अटक करण्यात आली. पेशाने शिक्षक असलेल्या या तथाकथित लव्हगुरूचे नाव धवल त्रिवेदी असून, त्याच्या कारनाम्यांमुळे सीबीआयने त्याच्या नावावर पाच लाख रुपयांचे ईनाम ठेवले होते
???? त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्यावर फेसबुकवर पोस्ट केल्यानं एका पत्रकाराला हल्ल्याला सामोर जावं लागलं. बिप्लव देव यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर टाकल्याने अज्ञातांनी पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
???? भारतीय संशोधकांनी अत्याधुनिक आणि स्वप्नवत वाटणारी शस्त्रास्त्रे तयार करण्याची तयारी केली आहे. डिफेंस रिसर्च ऐंड डेवलपमेंट ऑर्गनाइजेशन (DRDO) यांनी स्टार वॉर सिनेमात दिसणारी आणि कल्पनेत असलेली डायरेक्टेड एनर्जी वेपंस (DEWs) शस्त्रे बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
केज शहरातून तीन दुचाकींची चोरी
केज शहरातील विविध भागातून घरांसमोर लावलेल्या तीन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी केज पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील मंगळवार पेठेत वास्तव्यास असलेले किशोर पुरुषोत्तम शेटे यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी ( एम. एच. २३ जे ८२१ ) घरासमोर लावून झोपले असता अज्ञात चोरट्यांनी १३ सप्टेंबर रोजी रात्री १२.१५ ते १४ सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजेच्या दरम्यान शेटे यांची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली.
दुसऱ्या घटनेत राजस्थान राज्यातील हरफुल फुलचंद स्वामी ( रा. ढणी बाबालाकी ता. खंडेला जि. सीकर ) हे मजुरीच्या निमित्ताने केज शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या लोकरे मोबाईल दुकानाच्या पाठीमागे वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या मालकीची दुचाकी ( एम. एच. ४४ जे ५०२३ ) ही राहत्या घरासमोर लावून झोपले असता अज्ञात चोरट्यांनी १२ सप्टेंबर रोजी पहाटे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान त्यांची ३५ हजार रुपये किंमतीची ही दुचाकी चोरून नेली.
तर तिसऱ्या घटनेत कानडीमाळी ( ता. केज ) येथील सुरेश निवृत्ती पिंपळे हे मजुरीच्या निमित्ताने शिक्षक कॉलनीच्या दक्षिणेस प्रदीप जगनाथराव सोनवळकर यांच्या घरी भाड्याने वास्तव्यास आहेत. पिंपळे हे त्यांच्या मालकीची दुचाकी ( एम. एच. ४४ एच. ८३५ ) ही घरासमोर साखळीने बांधून घरात झोपले असता अज्ञात चोरट्यांनी सात सप्टेंबरच्या पहाटे चार वाजेच्या पूर्वी साखळी तोडून त्यांची दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली.
दरम्यान, किशोर शेटे, हरफुल स्वामी व सुरेश पिंपळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. या तिन्ही घटनांचा तपास पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे ह्या करत आहेत.