Site icon सक्रिय न्यूज

नियोजित द्रुतगती मार्गात बदल करू नये…..!

नियोजित द्रुतगती मार्गात बदल करू नये…..!
बीड दि. 26 – नियोजित लातुर – कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग) या मार्गामाध्ये बदल न करता लातुर – अंबाजोगाई -केज – बीड-जामखेड – अहिल्यानगर – कल्याण हाच मार्ग कायम ठेवण्याची मागणी खा. रजनीताई पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
           दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशना मध्ये आपण लातुर ते मुंबई हे अंतर सध्याच्या 10 ते 12 तासांवरुन 4 ते 5 तासांत पुर्ण करण्याच्या उद्देशाने लातुर कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग) हा महत्वाकांक्षी द्रुतगती प्रकल्प जाहीर केला आहे. उपलब्ध माध्यमांव्दारे मिळालेल्या माहितीनुसार हा मार्ग लातुर कळंब – पारा – ईट – खर्डा – जामखेड – अहिल्यानगर – कल्याण असा करण्याचे अनेक माध्यमांव्दारे निवेदनात दिसुन येत आहे.
मात्र लातुर – अंबाजोगाई केज बीड-जामखेड – अहिल्यानगर – कल्याण हा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे. तो मार्ग तांत्रिक, भौगोलिक तसेच सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अधिक योग्य व लाभदायक आहे. सदर मार्गामुळे बीड व अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येला थेट संपर्क मिळतो. वाहतुक सुलभ होते व कृषी, व्यापारी व औद्योगिक दळणवळणास चालना मिळते. त्यामुळे मार्गात बदल केल्यास अपेक्षित लाभ कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व बाबीचा विचार करता मार्ग न बदलता लातुर-अंबाजोगाई-केज बीड जामखेड अहिल्यानगर – कल्याण हाच नियोजित मार्ग कायम ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे.
शेअर करा
Exit mobile version