बीड दि.१७ – श्री क्षेत्र चाकरवाडी, बीड येथे आयोजित माऊली कृषी मेळ्यात सलाम किसानचा सहभाग किसानांचा प्रमुख केंद्रबिंदू ठरला आहे. ऍग्रिटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी सलाम किसानने येथे ड्रोन स्प्रे ऍडव्हान्स ऑफर, ड्रोन विक्री योजना, ड्रोन फ्रँचायझी संधी आणि महिलांसाठी खास महाशक्ती ड्रोन ताई योजनेचा प्रकाशप्रसार केला आहे.
ड्रोन स्प्रे बुकिंगची सोय, कृषी व्यवसायाशी संबंधित व्यक्तींसाठी चॅनेल पार्टनर होण्याची सुविधा उपलब्ध आहे, तर ड्रोन विक्रीसोबत अनुदान योजनेची संपूर्ण माहिती दिली जात आहे. विशेषतः महिलांसाठी असलेल्या महाशक्ती ड्रोन ताई योजनेत प्रशिक्षण, प्रमाणपत्र आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्रामीण महिलांना सक्षम होण्यास चालना मिळेल. दुसरीकडे, ड्रोन फ्रँचायझी ऑफरमुळे स्थानिक उद्योजक कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू शकतील, ज्यात संपूर्ण सहाय्य आणि मार्केटिंग मदत समाविष्ट आहे. सलाम किसान संघटनेतील महेश सोनवाने (MDO), इश्वर साबळे आणि बलनाथ सिरसाठ हे ड्रोन पायलट प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत. या योजना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत दुप्पट वाढ करतील. सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की या संधींचा लाभ घ्या. सलाम किसानसोबत कृषी क्रांतीत सामील व्हा असे आवाहन करण्यात येत आहे.

