केज दि.१५ – तालुक्यातील रामेश्वरवाडी येथे शेतात ट्रॅक्टर नेऊ नको. म्हणाल्याचा राग आल्याने एकाला गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वरवाडी ता. केज येथे दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९:०० वा. च्या सुमारास शशिकांत हंगे यांच्या शेतातुन किशोर हंगे हा ट्रॅक्टर घेवुन जात असताना त्यास रामेश्वर हा म्हणाला की, शेतातुन ट्रॅक्टर घेवुन जावु नको. त्यामुळे किशोर हांगे यास राग आला. त्यातून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्या नंतर शशिकांत हंगे हा घरी जात असताना त्याला किशोर हंगे याने जिल्हा परिषद शाळे जवळ अडवून पोटात बुक्कयाने मारहाण केली. तसेच सचिन हंगे, नितीन हंगे व दयानंद हंगे यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने बॅटने व लोखंडी गजाने मारहाण केली. यात शशिकांत हंगे याच्या डोक्यात व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या चंदन यास पण मार लागला आहे. त्या नंतर जखमी हा शशिकांत हंगे हा बेशुद्ध पडला त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र नांदूरघाट येथे प्रथमोपचार करून बीड येथील जिल्हा रुग्णालयात भरती केले. तेथून उपचार घेऊन आल्या नंतर या प्रकरणी दि.१४ सप्टेंबर रोजी शशिकांत हंगे याने केज पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्या नुसार किशोर हंगे, सचिन हंगे, नितीन हंगे व दयानंद हंगे या चौघाच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. सिद्धे हे पुढील तपास करीत आहेत.