Site icon सक्रिय न्यूज

सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या रोहन गलांडे विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद…..!

सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या रोहन गलांडे विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद…..!

केज दि.२२ – सातत्याने सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या रोहन उत्तम गलांडे (रा. चिंचोलीमाळी ता. केज) याने शनिवारी (दि. २१) समाज माध्यमाद्वारे व त्याचे फेसबुकवरून केज येथील लखन हजारे व दलित बांधवांना गल्लिच्छ शब्दात उद्देशून आई, बहीणीवर अश्लील भाषेत शिव्या देऊन चारित्र्य हाणन करून प्रतिष्ठेला हानी पोहचेल असे जाणून बुजून शांततेचा भंग करून महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचविण्याच्या व जातीय द्वेष व वैमनस्य पसरविण्याची कृती केल्याप्रकरणी केज पोलिसात रविवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान ॲट्रॉसिटीचा गून्हा नोंद झाला आहे.
रोहन उत्तम गलांडे याने शनिवारी (दि. २१) वंचीत बहुजन आघाडी, दिव्य लोकप्रभा वाचक समुह या व्हाटसअप ग्रुपवर व इतर समाज प्रसार माध्यमावरही लखन हजारे व दलित बांधवांना अश्लील व गलिच्छ भाषेत उद्देशून पोस्ट व्हायरल केली होती. त्यात महिलेची अवहेलना व अपमान होईल अशा शब्दाचा वापर करून जातीय द्वेष व वैमनस्य पसरविण्याच्या उद्देशाने धमकी दिली. अशी तक्रार लखन हजारे यांनी दिल्यावरून रोहन उत्तम गलांडे (रा. चिंचोलीमाळी ता. केज) याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह समाजातील शांततेचा भंग करणे, चारित्र्य हाणन करून महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचविणे व समाजात जातीयद्वेष व वैमनस्य पसरविणे या कलमाखाली रविवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान केज ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत. दरम्यान, रोहन गलांडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज सोमवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

शेअर करा
Exit mobile version