केज दि.२ – तालुक्यातील साळेगाव येथील रहिवासी तथा तंत्रस्नेही तरुणाचे अवघ्या 28 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकाली निधन झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
अत्यंत मनमिळावू, मितभाषी आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा गौरवकुमार अरुण झाडबुके याचे आज ऐन होळीच्या दिवशी अचानक सकाळी 8.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालेले निधन. सदरील घटना कुटुंबीय आणि मित्र परिवारासाठी खूप वेदनादायी आणि क्लेशकारक आहे.
सोमवारी दुपारी ४ वाजता, बस स्टँडच्या पूर्वेला, साळेगाव येथे त्यांच्या शेतात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, ऐन तरुण्यातच हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे.

