केज दि.५ – केज-कळंब रोडवर साळेगाव पासून जवळ असलेल्या चिंचोली पाटी, हॉटेल लालपरी जवळ सकाळी ६:०० वाजता एका रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कोल्हापूर माजलगाव गाडीची धडक लागली. अपघातात एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरसह इतर तेरा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना ॲम्ब्युलन्सचे पायलट सुमित तेलंग हे उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले आहे.
तसेच या अपघाताची माहिती जय जोगदंड यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली. त्याच बरोबर पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदतीसाठी प्रयत्न केले.
दरम्यान सर्व जखमींवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना संदर्भात सेवेसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे सुमित तेलंग यांच्या ॲम्ब्युलन्स मधून हलविण्यात येत आहे. दरम्यान अपघातस्थळी पोलिस उपनिरीक्षक राकेश बनसोडे यांनी भेट दिली.
जखमींची नावे :-
१) ड्रायव्हर आनंद गायके, वय ४० वर्ष, २)कंडक्टर विष्णू तांबडे वय (४२ वर्ष) आणि प्रवासी ३)संजय खरात वय (३५ वर्ष), ४)चैतन संजय खरात, वय (१६ वर्ष), ५)भास्कर गायकवाड, वय (३६ वर्ष), ६)आशा खरात, वय (२५ वर्ष), ७) सचिन खरात, वय (३० वर्ष), ८)रोशनी खरात, वय (१८ वर्ष), ९) भाग्यश्री गायकवाड, वय (३० वर्ष), १०)पायल गायकवाड, वय (१५ वर्ष) आणि ११) सुनिता खरात, वय (३२ वर्ष), १२) सचिन सुरवसे, वय (४५ वर्ष), १३) वैशाली राऊत वय (३२ वर्ष)

