केज दि.१८ – तालुक्यातील आडस येथे शुक्रवार (दि.१८) रोजी मध्यरात्री पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनेने गावात होणाऱ्या चोरीच्या घटनेची मालिका कांही केल्या थांबत नसल्याने चोरांचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनास येणाऱ्या अपयशामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील आडस येथे शुक्रवारी मध्यरात्री ज्ञानोबा पोटभरे, शौकत पठाण, अशोक गायकवाड व प्रभाकर आकुसकर यांच्या घरी चोरीच्या घटना घडल्या. तर सुधाकर वाघमारे यांच्या घरी घरातील लोक जागे झाल्याने चोरीच्या प्रयत्न अयशस्वी ठरला. या चोरीच्या घटनेत ज्ञानोबा पोटभरे यांच्याकडे असलेल्या स्वस्त धान्य दुकानातील दोन कट्टे गव्हू व एक कट्टा तांदूळ, प्रभाकर आकुसकर यांच्या घरातील दोन भ्रमणध्वनी व कानातील दागिणे, शौकत पठाण यांच्या घरातील मिस्त्री कामाचे अवजारे तर अशोक गायकवाड यांच्या घरातील जुनी पेटीची चोरी करून जवळच्या शेतात सामान विस्कटून टाकले. सुधाकर वाघमारे यांच्या घरातील व्यक्ती जागे झाल्याने चोरांनी पळ काढला. या सर्व चोरीच्या घटना पहाता चोरी करणारे परिसरातील भूरटे चोरटे असल्याची ग्रामस्थात चर्चा आहे. यापुर्वीही अनेकदा गावात एकाच रात्री बाजारपेठेतील दुकानाचे शटर वाकवून चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनेतील चोरांना पकडण्यात अद्याप पोलीस प्रशासनास यश आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
——————————————
आडस येथे महिना-दोन महिण्याच्या कालावधीत एकाचवेळी अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र अद्याप एकाही चोरीच्या घटनेतील चोरांचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनास यश आले नाही. त्यामुळे चोरांचा शोध लावण्याचे पोलीसांसमोर आवाहन उभे आहे.
——————————————-
धारूर येथे एन-९५ मास्कचे वाटप
——————————–
धारूर दि.१८ – अहोरात्र कोरोनाशी लढा देणारे डॉक्टर्स, पोलीस, पत्रकार, सफाई कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणेशी निगडीत असलेल्यांना जनविकास सामाजिक संस्था, गुड शेअर आणि अरविंद अँडव्हान्स मटेरिअल्सच्या वतीने धारूर येथे एन-९५ मास्कचे वाटप करण्यात आले.
कोरोनाशी लढणारे व रुग्णांवर उपचार करून त्यांची शुश्रूषा करीत असलेले डॉक्टर्स, नर्सेस तसेच कोरोना रोखण्यासाठी जीव धोक्यात सफाई कामगार. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ऑन ड्युटी २४ तास सेवा करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच कुटुंबाची पर्वा न करता वार्तांकन करणारे पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधी तसेच अंगणवाडी व आशा स्वयंसेविका यांना जनविकास सामाजिक संस्था आणि गुड शेअर व अरविंद अँडव्हान्स मटेरिअल्स यांच्या संयुक्त विद्यमाने धारूर येथील पोलीस स्टेशन, ग्रामीण आरोग्य केंद्र, नगर परिषद, कोव्हिड उपचार केंद्र येथे जनविकास सामाजिक संस्थेचे रमेश भिसे आणि गुड शेअर व अरविंद अँडव्हान्स मटेरिअल्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेले एन-९५ मास्क वाटप करण्यात आले. या प्रसंगी धारूरचे नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी, बाळराजे गायकवाड, मुख्याधिकारी नितीन बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती धस मॅडम, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे अनिल महाजन, वैद्यकीय अधिक्षक डॉ. आदमाने, सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण नेहरकर, कार्यालयीन अधीक्षक नितीन ईघाते, स्वच्छता निरीक्षक सचिन डावकर, कोव्हीड केंद्राचे कर्मचारी, पत्रकार गौतम बचुटे, विजय भिसे, मच्छिंद्र लांडगे, आशा कापसे, स्वाती अंकुशे यांच्यासह प्रमुख मान्यवर यांची उपस्थिती होती.
—————————————-
“जनविकास संस्थेने नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी दिलेले मास्क हे दर्जेदार व प्रमाणित असल्याने आम्ही त्यांचे ऋण व्यक्त करीत आहोत”
डॉ स्वरूसिंह हजारी,
नगराध्यक्ष, धारूर
———————————————-
“जनविकास सामाजिक संस्थेचे कार्य हे भरीव स्वरूपाचे असून रमेश भिसे व त्यांचे सहकारी यांची सामान्यांच्या प्रगतीसाठीची तळमळ वाखाणन्याजोगी आहे.”
अनिल महाजन,
मराठी पत्रकार परिषद
————————————–
“अहोरात्र कोरोनाच्या संपर्कात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क दिले. त्या बद्दल आभार.
सुरेखा धस,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, धारूर
——————————————–