Site icon सक्रिय न्यूज

मुंबईमध्ये होणार कोविशील्ड लसीची चाचणी

बीड – कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय औषध महानियंत्रकांनी (ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया) मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीची चाचणी करण्यास सांगितलं आहे.

केंद्र सरकारकडून या चाचणीला संमती मिळाल्यानंतर प्रशासनाने ही चाचणी सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या लसीच्या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींची तपासणी करायला सुरुवात केली आहे. या तपासण्या झाल्यानंतर एथिक कमिटीची परवानगी घेऊन कोविशिल्ड लसीची चाचणी सुरु करण्यात येणार असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं आहे.यापूर्वी यूकेमध्ये ऑक्स्फर्डच्या या लसीचा एका रुग्णावर दुष्परिणाम झाल्यामुळे चाचणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्रुटी दूर झाली असल्यामुळे शनिवारपासून ही चाचणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच नायर रुग्णालयातही सर्व बाबींची पूर्तता करुन लसीची चाचणी सुरु करण्यात येईल. आतापर्यंत या चाचणीसाठी 100 व्यक्तींनी नोंदणी केल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिले आहे.

दरम्यान लसी संदर्भात सकारात्मक बाबी समोर येत असल्याने संपूर्ण जगाला हादरून टाकणाऱ्या कोरोना आजारावर लवकरच नियंत्रण मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शेअर करा
Exit mobile version