Site icon सक्रिय न्यूज

दारूच्या नशेत पत्नीची पतीला मारहाण,पतीची पोलिसात धाव

???? जागतिक पातळीवर अमेरिकेला मागे टाकत भारताने जागतिक Covid 19 रोगमुक्तांची (रोगातून बरे झालेल्याची) संख्या सर्वात जास्त असणारा देश म्हणून स्थान मिळवले. ४२ लाखांपेक्षा जास्त  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
???? शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे किमान वय पहिली वर्गाच्या प्रवेशासाठी किमान 6 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे तर व प्ले ग्रुप / नर्सरीसाठी प्रवेश घेण्यासाठी किमान 3 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
???? कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.
???? खान्देशात पावसाचे थैमान सुरूच , पावसामुळे उडीद, मुंग यांचे भरपूर प्रमाणात नुकसान
???? उत्तर प्रदेशातील गाजियाबादमधील मोदीनगर भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशात कायद्यानुसार मुलींनाही आई-वडिलांच्या संपत्तीत हिस्सा आहे. मात्र एका मुलाला आपल्या आईचा हा निर्णय आवडला नाही. मुलीला संपत्तीचा हिस्सा देत असल्याच्या रागात सख्खा मुलाने आपल्या आईला जीवे मारले. गोळी घालून तिची हत्या केली.
???? ग्रीनहाऊस वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण आणि वेग कायम राहिल्यास २१०० पर्यंत जगात समुद्राची पाणी पातळी तब्बल १५ इंचाने वाढण्याचा धोका नासाने केलेल्या एका संशोधनातून समोर आला आहे. जगातील ३६ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय संस्थांमधील ६० पेक्षा जेष्ठ शास्त्रज्ञांच्या समूहाने हे संशोधन केले आहे. बर्फाळ प्रदेश, महासागर आणि वातावरण या क्षेत्रात काम करणारे हे सर्व शास्त्रज्ञ आहेत.
???? जळगाव : १५ वर्षीय मुलीवर चार तरुणांनी सामुहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड खुर्द येथे १८ सप्टेंबरला रात्री घडली. जळगाव जामोद पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून १९ सप्टेंबरला पहाटे साडेपाचलाच तीन तरुणांना अटक केलीे तर एक जण फरार आहे.
???? दर चार वर्षांनी येणाऱ्या अधिकमासाला हिंदुधर्मीयांत मोठे महत्त्व आहे. यंदा तब्बल १६० वर्षांनंतर लीप इयर आणि आश्विन अधिकमास एकत्र आल्याने या वर्षी आलेल्या अधिकमासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापूर्वी १८६० मध्ये असा अधिकमास आला होता. त्यानंतर असा योग आला आहे.
???? प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सकाळी साडे सात वाजल्यापासून शिकाऊ परवान्यासाठी चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे.
???? कोविड-१९ मुळे विस्कळीत झालेल्या आर्थिक व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने स्थावर मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. शासनाने मुद्रांक शुल्कात सूट दिल्याने आता स्थावर मालमत्ता खरेदी आता स्वस्त झाली आहे. या निर्णानुसार, १ सप्टेंबर २०२०पासून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये मालमत्ता घरेदीसाठी आता २ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल जे पूर्वी ५ टक्के होते.
???? महाराष्ट्रचे दिग्गज नेते आणि भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंह यांचं निधन झालं आहे. आज सकाळी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते.
——————————————-
दारूच्या नशेत पत्नीकडून पतीला मारहाण,पतीची पोलिसात धाव……!

अहमदाबाद | दारूच्या नशेत पतीने पत्नीला मारहाण अशा घडलेल्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र दारूच्या नशेत पत्नीने पतीला बेदम मारहाण केली असल्याचं फार क्वचितच ऐकलं असेल. अशीच एक घटना घडली आहे अहमदाबामध्ये.

अहमदाबादमधील मणिनगरमध्ये एका पुरुषाने पत्नी मारहाण करत असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. शिवाय मला सुरक्षा द्यावी अशी मागणी देखील या व्यक्तीने खोकरा पोलिस स्टेशनमधील पोलिसांना केली आहे.

2018 मध्ये २९ वर्षीय व्यक्तीचा २५ वर्षीय मुलीसोबत लग्न झालं होतं. त्यावेळी पत्नीच्या दारुच्या व्यसनाबद्दल पतीला कोणतीही कल्पना नव्हती. लग्नानंतर ती दारू पिऊन धिंगाणा घालू लागली. पतीने तिची दारूची सवय सोडवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तिचं व्यसन वाढतंच गेलं. काही दिवसांनी ती सासू सासऱ्यांनाही दारू पिऊन मारू लागली.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी पत्नीने पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार केली होती. त्यानंतर पत्नी आपल्याला कोणत्याही खोट्या प्रकरणात अडकवू शकते म्हणून पतीने खोकरा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करत सुरक्षा पुरवावी अशी मागणी केलीये.

शेअर करा
Exit mobile version