Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या…..!

केज दि.२५ – अतिवृष्टीने झालेले नुकसान, दुबार पेरणीचे संकट व लॉकडाउनमुळे हाताला काम मिळत नसल्याच्या नैराश्यातून तालुक्यातील कानडी माळी येथील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
           मागच्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे कुठेच काम मिळत नाही. त्यात शेतात सोयाबिन पेरले तर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दुबार पेरणीनंतर आलेले सोयाबीनही अतिवृष्टीने वाहून गेले. या सर्व बाबीला कंटाळून तालुक्यातील कानडी माळी येथील पुरुषोत्तम डिगांबर राऊत (३५) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी पत्र्याच्या आडूला शुक्रवारी पहाटे आत्महत्या केली. सदर प्रकरणी केज पोलिसात नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आईवडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून घरातील कर्ता गेल्याने घर उघड्यावर पडले आहे.
————————————————–
मयत पुरुषोत्तम राऊत
मांजरा धरणाचे मुख्य कार्यालय
धरणक्षेत्रावर  करा – राहुल खोडसे
_______________________
केज – तालुक्यात असलेल्या मांजरा धरणाचे मुख्य कार्यालय लातूर येथे असून ते कार्यालय धरणावर किंवा धरणक्षेत्रात करण्यात यावे यासाठी संभाजी ब्रिगेड केज च्या वतीने तहसीलदार यांना निवेदनात देण्यात आले आहे.
            मांजरा धरण हे प्रामुख्याने लातूर, अंबाजोगाई, केज, धारूर सह ५० ते ६० ग्रामपंचायत ला पिण्यासाठी पाणी पुरवठा करणारे एकमेव धरण आहे. या धरणावर शेतकरी मोठया प्रमाणात अवलंबून आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यात गेल्या असे शेतकरी उपाशी आणि ज्यांचं काहीही नुकसान झालेलं नाही किंवा जमिनी गेलेल्या नाहीत असे तुपाशी आहेत. धरणग्रस्त शेतकऱ्याच्या काही अडी अडचणी असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की कोणाशी संपर्क करावा? याचे कार्यालय तर लातूर येथे आहे, त्यामुळे धरणावर कोणी अधिकारी सापडत नाही. काही काम असेल तर धरण केज तालुक्यात असून लातूर ला चकरा माराव्या लागतात. पाणी वाटप समितीचे अध्यक्ष लातूरचे पालकमंत्री असल्याने हा अन्याय येथिल धरणग्रस्त शेतकरी वर्गावर का ? म्हणून प्रशासनाने येथील सर्वसामान्य जनतेचा विचार करून धरणाचे मुख्य कार्यालय हे धरणावर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड  केज तालुका अध्यक्ष राहुल खोडसे यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेड चे शशिकांत इंगळे, संदीप शितोळे, विष्णू थोरात, हर्षवर्धन खोडसे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
शेअर करा
Exit mobile version