नाशिक | नाशिककरांसाठी एक चांगली बातमी आहे. शहरातील कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट हा 91.0 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. हा राज्यातील सर्वात चांगला रिकव्हरी रेट आहे.
24 सप्टेंबरला मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात नाशिक शहराचा रिकव्हरी रेट सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. तर संपूर्ण राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा 75.09 टक्के इतका आहे.
वैद्यकीय विभागाच्या म्हणण्याप्रमाणे, चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे शिवाय वेळीच रुग्णांवर उपचार होत असल्यामुळे रिकव्हरी रेट वाढला आहे. त्याचप्रमाणे ऍक्टिव्ह रूग्णांची संख्याही 5 हजारांवरून साडेतीन हजारांवर आलीये.