Site icon सक्रिय न्यूज

केजमध्ये मटका तेजीत…….!

केजमध्ये मटका तेजीत…….!
केज मध्ये मटका घेणाऱ्या दोघा तर  एका सोरट घेणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
केज  – शहरातील मंगळवार पेठेसह क्रांती नगर भागात मटका घेत असलेल्या दोघा विरूद्ध आणि कोरेगाव येथे सोरट घेणाऱ्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या कडून मटका व सोरट खेळण्याच्या साहित्यासह नगदी ८६० रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.
           केज शहरातील मंगळवार पेठेत सार्वजनिक ठिकाणी  सुभाष दिगंबर देशमाने हा मटका घेत असल्याच्या माहिती वरून पोलिस नाईक अशोक अंजनराव नामदास यांनी धाड टाकून मटक्याच्या साहित्यासह नगदी ३९० रुपयाचा ऐवज जप्त केला. ही कारवाई दिनाक २५ सप्टेंबर रोजी करण्यात आली. तर  क्रांती नगर भागात करून शंभू लोंढे  हा मटका घेत असल्याच्या माहती वरून धाड टाकून मटक्याच्या साहित्यासह नगदी ४७० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच कोरेगाव ता. केज येथे सोरट नावाचा जुगार चालविणाऱ्या विरुद्धही या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात पोलिस नाईक अशोक अंजनराव नामदास आणि दिनकर पुरी यांच्या फिर्यादी वरून तीघा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार गुजर करत आहेत.
——————————————————-
पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावर स्थान दिल्याने कर्तृत्व सिद्ध – विष्णू घुले
केज  – स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षे काम केलेल्या पंकजा मुंडे यांना थेट राष्ट्रीय स्तरावर स्थान दिल्याने पंकजा मुंडे यांचे कर्तृत्व सिद्ध झाल्याचे मत युवा नेते विष्णू घुले यांनी व्यक्त केले.
           भाजपच्या जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदी विराजमान केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल केज तालुक्यात भाजपचे युवानेते तथा मुंडे कुटुंबाचे निकटवर्तीय विष्णू घुले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आनंदोत्सव साजरा केला.
         दरम्यान पंकजा मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर राज्य स्तरावर कॅबिनेट मंत्री म्हणून विविध खात्याचा कार्यभार सांभाळत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केलेले आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक भागात त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक आमदार खासदार निवडून आणण्याचे काम सुद्धा त्यांनी केलेले आहे. महिला व बालकल्याण खाते त्यांच्याकडे असताना त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्न सोडवले असून ग्रामविकास मंत्री असताना जिल्ह्यासाठी भरीव निधी देऊन जिल्ह्याचा विकास करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी सोडवण्याला प्राधान्य देत त्यांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले असून आता त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याने तिथे सुद्धा त्या आपल्या कार्यशैलीमुळे नक्कीच छाप पाडतील असा विश्वास विष्णू घुले यांनी व्यक्त केला.
केज येथे 45 वर्षीय इसमाची आत्महत्या
———————————
 केज – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातलतील जुन्या पोलीस स्टेशनच्या जागेत वसंत विष्णू गुंड  (४५ ) वर्ष यांनी लिंबाचे झाडाला गळफास घेऊन आमहत्या केली आहे.
           केज येथील मंगळवार पेठ डॉ. आंबेडकर चौकातील जुन्या पोलीस स्टेशनच्या प्रांगणातील लिंबाच्या झाडाला गळ्यातील गमजाने आत्महत्या केली आहे. माहिती मिळाल्या नंतर सहाय्यक फौजदार महादेव गुजर, पोलीस नाईक अशोक नामदास, हनुमंत गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. प्रेत उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे नेले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपासात निष्पन्न होईल.
शेअर करा
Exit mobile version