Site icon सक्रिय न्यूज

प्लॉटसाठी साळेगाव च्या तरुणाने गाठला कळस……सिनेस्टाईल आंदोलन करून मागणी करून घेतली मान्य…….!

केज दि.२८ – वडिलांनी परस्पर विकलेला प्लॉट परत देण्याच्या मागणीसाठी केज तालुक्यातील साळेगाव येथील एका तरुणाने हनुमान मंदिरावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार पोलीस अधिकारी आणि सरपंच यांच्या मध्यस्तीने त्याची समजूत काढून त्यास खाली उतरले.
       साळेगाव ता. केज येथील प्रदीप दत्तू येळवे ह्या तरुणाचे वडील दत्तू येळवे यांनी विष्णू इंगळे यांना प्लॉट विकला होता. परंतु प्रदीप इंगळे याचा त्यास विरोध होता. सदर प्लॉट हा परत मिळावा या मागणीसाठी प्रदीप येळवे हा गावातील हनुमान मंदिराच्या कळसावर चढून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी देत होता. याची माहिती तहसीलदार मेंढके व पोलीस प्रशासनाला मिळताच तहसीलदार दुलाजी मेंढके, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे व सरपंच कैलास जाधव यांनी त्याची समजूत काढून सदर प्लॉट परत देण्याचे सर्वासमक्ष आश्वासन दिले व खाली उतरण्याची विनंती केली. त्या नंतर प्रदीप येळवे हा खाली उतरला. या वेळी तहसीलदार मेंढके, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, तलाठी इनामदार, सरपंच कैलास जाधव, माजी सरपंच नारायण लांडगे, पत्रकार गौतम बचुटे, पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, हनुमंत चादर, जिवन करवंदे, अशोक नामदास, मतीन शेख यांनी मध्यस्ती केली. पुढील अनर्थ टाळता यावा म्हणून अग्निशामक दल व आपत्ती विभागाचे स्वयंसेवकही तयारीत होते.
—————————————————–विवाहित महिलेवर अत्याचार……!
       केज तालुक्यातील ३२ वर्षीय महीला ही  १९ सप्टेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास शौचाला बाजरीच्या शेतात गेली होती. याचवेळी तिच्यासोबत कोणी नसल्याची संधी साधून आरोपी बाळकिसन शेषेराव चौरे ( वय ३८,  रा. जिवाचीवाडी ता. केज ) हा महिलेच्या पाठीमागे गेला. तू मला लय आवडतेस असे म्हणत त्याने तिचा हात धरुन खाली पाडत तिचे तोंड दाबून जबरदस्तीने बलात्कार केला. या घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले, तर तुला व तुझ्या पतीला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित महिलेने सहा दिवस या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. शेवटी तिने घडलेल्या प्रकारची माहिती पतीला दिल्यानंतर पतीने पीडित पत्नीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. २७ सप्टेंबर रोजी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी बाळकिसन शेषेराव चौरे याच्याविरुध्द केज पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
     दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी आरोपीच्या शोधात फौजदार श्रीराम काळे व जमादार बाळकृष्ण मुंडे यांचे पथक रवाना केले. त्यांनी आरोपीला अटक करून २८ सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर हजर केले. आरोपी बाळकिसन चौरे यास तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून फौजदार श्रीराम काळे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version