Site icon सक्रिय न्यूज

केज शहरात खाजगी कोव्हीड केअर सेंटर ला मान्यता

केज शहरात खाजगी कोव्हीड केअर सेंटर ला मान्यता
केज दि.३ – दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर आवश्यक सुविधा असलेल्या खाजगी दवाखान्यात ही कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहेत.आणि याचाच एक भाग म्हणून केज (जि. बीड) शहरातील योगिता बालरुग्णालयाला दि.२ ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशान्वये कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली असून परिसरातील कोरोना रुग्णांची सोय होणार आहे.
           राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. रुग्णांना वेळेवर आणि आवश्यक उपचार मिळण्यासाठी सरकारी रुग्णालयात उपचार होत आहेत. मात्र या बरोबरच खाजगी रुग्णालयात ही कोव्हीड केअर सेंटर कार्यान्वित करण्याचे प्रावधान आहे. आणि याच पार्श्वभूमीवर केज शहरातील डॉ.दिनकर राऊत यांच्या योगीता बालरुग्णालयाला जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी आवश्यक अटी व नियमांचे पालन करून दि.२ ऑक्टोबर पासून कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
        दरम्यान केज शहरात खाजगी कोव्हीड सेंटर सुरू होत असल्याने परिसरातील रुग्णांची सोय होणार आहे.
शेतात शेळी गेल्याच्या कारणावरून बेदम मारहाण
केज दि.३ – तालुक्यातील माळेवाडी येथील अण्णा आप्पा हजारे यांची शेळी शेतात गेली म्हणून फिर्यादीसह कुटुंबातील इतर सदस्यांना बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
        माळेवाडी येथील अण्णा आप्पा हजारे यांची शेळी शेतात गेली म्हणून दि.२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान फिर्यादीचे घरासमोर छंदर श्रीपती हजारे, सुंदर श्रीपती हजारे, भीमराव दशरथ हाके, ज्योतिराम भीमराव हाके, अशोक अर्जुन हाके, विकास सुंदर हजारे, कैलास सुंदर हजारे, अश्विनी ज्योतिराम हाके, अल्का अशोक हाके या सर्वांनी मिळून फिर्यादीचे वडील, भाऊ, भावजय यांना लाथाबुक्क्याने मारून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पो. कॉ. श्री. ढाकणे हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version