केज दि. ९ – उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळालेल्या माहितीवरून अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथून दि.9 रोजी दुपारी 2.30 वाजता बोलेरो गाडीत 32 किलो चंदन (किंमत 64000) घेऊन येणाऱ्या गाडीची झडती घेऊन चौकशी केली असता गाडी चालकाने सदरील चंदन केजचे माजी नगरसेवक बालाजी जाधव यांच्या सांगण्यावरून घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यावरून चंदन चोरी प्रकरणी चालक, गाडी मालक व माजी नगरसेवक बालाजी जाधव यांच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.