केज दि.१० – तालुक्यातील हादगाव येथे एका 30 वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील हादगाव येथील झुंबरलाल शिवाजी हांगे हे सायंकाळी 5 च्या दरम्यान शेतातून घरी येत असताना वीज कोसळली त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान आज दुपार नंतर तालुक्यात कांही ठिकाणी विजेच्या प्रचंड कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. रात्री उशिरापर्यंतही पावसाची रिमझिम सुरूच होती.
दरम्यान तालुक्यातील उमरी गावातील हुरा शिवारात दुपारी तीन ते चार च्या दरम्यान वीज पडल्याने संतोष मेघराज भैरट हा तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली.
भाजपचे युवानेते तथा टाकळीचे सरपंच मा.विष्णू घुले यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना सक्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे यांच्यासह पत्रकार श्रावनकुमार जाधव, दिपक नाईकवाडे, डी. डी. बनसोडे, संतोष गालफाडे, हनुमंत सौदागर व शितोळे सर……..