Site icon सक्रिय न्यूज

शेतकऱ्यांना कर्ज घेणे झाले सोपे…..!

शेतकऱ्यांना कर्ज घेणे झाले सोपे…..!

नवी दिल्ली | पंचायत राज मंत्रालयाकडून ग्रामीण भारतासाठी आज महत्वाची योजना लाँच करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जमीनीच्या मालकांना स्वामित्व योजनेअंतर्गत संपत्ती कार्ड वितरित करण्याच्या योजनेला सुरुवात करणार आहेत

स्वामित्व योजनेमध्ये तब्बल 1 लाख जमीन मालकांना त्यांच्या मोबाईलवर एमएमएस येणार आहे. यामध्ये असलेल्या लिंकद्वारे हे माल त्यांचे संपत्ती कार्ड डाऊनलोड करू शकतील.या योजनेनुसार भूधारक त्यांची संपत्तीचा आर्थिक संपत्तीसारखा वापर करू शकणार आहेत. या संपत्तीचा उपयोग कर्ज घेणं किंवा अन्य आर्थिक लाभ घेण्यासाठी केला जाऊ शकतो.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version