केज दि.११ – दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना केज – कळंब रस्त्यावरील मांगवडगाव फाट्याजवळ घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
धारूर शहरातील झारे गल्ली भागातील अजीम हकीम शेख हे बार्शी येथे सासुरवाडीतील कार्यक्रमासाठी नऊ ऑक्टोबर रोजी रात्री दुचाकीवरून निघाले होते. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला केज – कळंब रस्त्यावरील मांगवडगाव फाट्याजवळ कळंबकडून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने ( एम. एच. ४४ डब्ल्यू ८२०५ ) समोरासमोर जोराची धडक दिल्याने या अपघातात अजीम शेख हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ११ ऑक्टोबर रोजी सलीम चाँदसाहेब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम. एच. ४४ डब्ल्यू ८२०५ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार जनार्धन कांबळे हे पुढील तपास करत आहेत.