Site icon सक्रिय न्यूज

शाळा कधी उघडणार…..? …..वाचा बच्चू कडू यांचे सूचक विधान

शाळा कधी उघडणार…..? …..वाचा बच्चू कडू यांचे सूचक विधान

मुंबई | दिवाळीनंतरही कोरोनाचा संसर्ग वाढतच राहिला तर, राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करणे अशक्यच राहील, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार करत होतो. मात्र, करोनाची वाढती परिस्थिती पाहता दिवाळीनंतर याची दुसरी लाट आली आणि संक्रमण वाढले तर आपल्याला दिवाळीनंतरही शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत, असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.

करोनाचे संक्रमण आतापेक्षा कमी झाले आणि आपल्याला वाटले की, शाळा सुरू करायला हरकत नाही. त्यावेळी त्या सुरू करता येतील, असंही बच्चू कडू म्हणाले.

शिक्षकांना कोरोनाची लागण…….!

कर्नाटकमध्ये शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने मुख्यमंत्री बी.एस येडीयुरप्पा यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षकांना कोरोना झाल्याने कर्नाटकात 12 ते 30 ऑक्टोबरदरम्यान शैक्षणिक कामकाज बंद ठेवण्यात येणारे.

सध्याच्या परिस्थितीत विद्यागम कार्यक्रमाअंतर्गत कर्नाटकात सरकारी शाळेतील शिक्षक मुलांना त्यांच्या विभागात जाऊन शिक्षण देत आहेत. मात्र आता कार्यक्रमाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलीये.

मुख्यमंत्री म्हणाले, अनेक शिक्षकांना कोरोना झाल्याचं समजताच तीन आठवडे शैक्षणिक कामकाज बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आलेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय.

शेअर करा
Exit mobile version