लखनऊ | उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमध्ये उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या सौम्या पांडे यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर 15 व्या दिवशीच त्यांनी पुन्हा कार्यालयात हजेरी लावली आहे.
कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी 26 वर्षीय सौम्या यांनी आपल्या लहान बाळाला घेऊनच कार्यालयात उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या निर्णयाचं सध्या सर्व स्तरांमधून कौतुक होताना दिसत आहे.
सौम्या यांना मॅटर्निटी लीव्ह घेण्याची मूभा होती. मात्र त्यांनी सुट्टी घेण्याऐवजी आपल्या क्षेत्रामध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्या संदर्भातील महत्वाचे दौरे सुरुच ठेवलेत.
अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा – परिमळा घुले
केज – सध्या शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. मागच्या महिन्यात उभ्या पिकांमध्येही पाणी साठल्याने अर्धे उत्पन्न हातचे गेले होते. त्यात उरले सुरले मळणीसाठी काढून ठेवले होते ते ही मागच्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने मातीत गेले आहे. त्यामुळे अश्या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केज पंचायत समितीच्या सभापती परिमळा विष्णू घुले यांनी केली आहे.
पाऊसकाळ चांगला झाल्याने पिके चांगली आली होती. मात्र पिकांची काढणी करण्याच्या वेळेसही केज तालुक्यात बहुतांश भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने उभी असलेली अर्धी पिके हातची गेली. तरीही शेतकऱ्यांनी खचून न जाता जी काही पिके उरली होती ती काढून मळणी साठी काढून ठेवली होती. मात्र मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने ती पण पूर्णपणे उध्वस्त झाली असून शेतकरी वर्ग हताश झाला आहे.
दरम्यान पेरणी आणि मशागतीला आलेला खर्चही त्यातून मिळणे कठीण झाले असून तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यासाठी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी परिमळा घुले यांनी केली आहे.