Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्हयात विजेच्या कडकडाटासह  अतिमुसळधार पाऊसाची शक्यता….!खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

बीड दि. १४- जिल्हयात 13 ते 17 ऑक्टोबर 2020 या काळात विजेच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मूसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सुचनेनुसार  बीडसह मराठवाडयातील जिल्ह्यात हा इशारा देण्यात आला असून जनतेने खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

खबरदारीची उपाययोजना म्हणुन खालील प्रमाणे काळजी घ्यावी.यासाठी पुढील गोष्टी करा…….

1. विजेच्या गडगडाटासह पावसाची पुर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालुन बसा.
2. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा
घराबाहेरील ओटयावर थांबू नका.
3. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालु असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
4. तारांचे कुंपन विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुपासून दुर रहा.
5. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका……

1. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नका.
शॉवरखाली अंघोळ करु नका.
घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नका.

2. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालु असतांना लोखंडी धातूच्या सहायाने उभारलेल्या तंबुमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

3. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

4. धातुच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

5. जर आपण घरात असाल तर उघडया दारातून अथवा खिडकीतून वीज पडतांना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असे संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

शेअर करा
Exit mobile version