Site icon सक्रिय न्यूज

श्राद्ध घातल्यानंतर पुन्हा घरी आला तो……..!

सातारा | साताऱ्यात घरातून निघून गेलेला व्यक्ती तब्बल 8 वर्षांनी घरी परतला आहे. मुख्य म्हणजे हा व्यक्ती मरण पावला असं समजून नातेवाईकांनी तेरावं, श्राद्ध तसंच इतर विधीही उरकून घेतल्या. आणि एक दिवस अचानक हा व्यक्ती घरी आला.

साताऱ्यातील यशोधन निवारा आश्रम केंद्रात दलालाच्या तावडीतून सुटका केलेल्या 4 मनोरुग्णांना आणलं होतं. त्यामध्ये हा व्यक्ती देखील होता.त्याला त्याची माहिती विचारण्यात आली. पालघर जिल्ह्यातील मनोर तालुक्यात कोसबांड गाव असल्याचं त्याने सांगितलं. यानंतर त्याला तातडीने त्याच्या घरी सोडण्यात आलं.

शेअर करा
Exit mobile version