Site icon सक्रिय न्यूज

वृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात (योगिता कोव्हीड रुग्णालयात यशस्वी उपचार)

केज दि.१९ – तालुक्यातील टाकळी येथील एका वृद्ध दाम्पत्यावर शहरातील योगिता कोव्हीड रुग्णालयात यशस्वी उपचार झाल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तेंव्हा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
      तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी दाम्पत्य ( पतीचे वय ८३ व पत्नीचे वय ७५) मागच्या १० दिवसांपूर्वी कोरोना झाल्याने शहरातील डॉ. दिनकर राऊत यांच्या योगिता कोव्हीड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान दोघांनाही दमा आणि बापी चा ही त्रास होता. मात्र रुग्णालयाचे संचालक डॉ. दिनकर राऊत व डॉ. मधुकर जाधव यांनी त्यांच्यावर यशस्वी उपचार करून त्यांना कोरोना मुक्त केले. तर दहा दिवसानंतर रविवारी सदरील दाम्पत्यास पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या नातेवाईकां समवेत घरी सुखरूप पोहोंच केले. यावेळी कोरोना मुक्त वृद्ध दाम्पत्याच्या व नातेवाईकांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
       दरम्यान केज शहरात सुसज्ज असे योगिता कोव्हीड केअर सेंटर झाल्याने परिसरातील रुग्णांची सोय झाली असून तज्ज्ञ डॉक्टर्सच्या निगरानीखाली उपचार होत आहेत.
शेअर करा
Exit mobile version