मुंबई | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप करत भाजपचा राजीनामा दिला आहे. यावेळी एकनाथ खडसेंनी अंजली दमानिया यांचाही उल्लेख केला. खडसेंनी केलेल्या आरोपांंवर अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
माझा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात होता. कोणत्याही एका व्यक्तिविरोधात नव्हता. मी नितीन गडकरी आणि छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. पण एकनाथ खडसे यांनी जेवढा माझा छळ केला, तेवढा कोणी केला नसेल, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं, वाट्टेल ते बोलले. त्यामुळे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. त्यांना धडा शिकवण्यासाठीच एफआयआर दाखल केला, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे.खडसेंवरील विनयभंगाचा गुन्हा संपलेला नाही. तरीही कालही ते वृत्तवाहिन्यांवरून धांदात खोटे बोलले. त्यामुळे माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.