Site icon सक्रिय न्यूज

कोणतं व्हाट्सएप वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे…….?

फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्ऍप वापरण्यासाठी यापुढे यूझर्संना पैसे द्यावे लागू शकतात. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टवर यासंबंधीची माहिती दिली आहे. जगभरात व्हॉट्ऍपचे करोडो यूझर्स आहेत. व्हॉट्ऍप हे प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. पण, चांगली बातमी ही आहे की, व्हॉट्ऍप सर्व यूझर्संना नाही तर केवळ Whatsapp Business यूझर्संना यासाठी चार्ज करणार आहे.
???? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “मन की बात” कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला आहे. विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना “व्होकल फॉर लोकल”चा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा असं आवाहन मोदींनी देशवासीयांना केलं आहे.
???? कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत भारताला मोठे यश मिळाले आहे. भारतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनामुक्त होण्याचा दर वाढत असतानाच कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. गेल्या 24 तासात भारतात 50129 कोरोना रुग्ण आढळले आहेत त्याचवेळी 62077 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
???? Bihar उत्तर बिहारमध्ये निवडणुकीआधीच पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी घडलेल्या या घटनेमुळं अशी हिंसात्मक घडल्यामुळं साऱ्या देशाचं लक्ष याकडे वेधलं गेलं आहे. लोकशाही राष्ट्रामध्ये निवडणुकीआधीच झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये उमेदवाराचा मृत्यू झाला आहे.
???? राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. तर, कोकण- गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
???? देशभरातील एकूण ७८ लाख ६४ हजार ८११ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ६८ हजार १५४ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७० लाख ७८ हजार १२३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख १८ हजार ५३४ जणांच्या संख्येचा समावेश आहे.
???? नागपूर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजनानंतर नागपूरातील महर्षी व्यास सभागृहात यंदाचा विजयादशमी उत्सव पार पडला. कोरोना पार्श्वभूमीवर अगदी साधेपणानं हा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी अवघ्या ५० स्वयंसेवकांची उपस्थिती पाहायला मिळाली.
???? सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन ली कुन-ही यांचे रविवारी वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. कंपनीने ली कुन-ही यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन ली कुन-ही यांचे 25 ऑक्टोबर रोजी निधन झाल्याचे वृत्त सांगताना आम्हाली खूप दुःख होत आहे. सॅमसंगला जगातील सर्वश्रेष्ठ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीपैकी एक बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचा वारसा सदैव राहील, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
???? भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, प्रत्येक बँकेला जुन्या, फाटलेल्या नोटा ग्राहकांकडून स्वीकाराव्या लागतील. यात केवळ एकच अट आहे, या नोटा नकली नसाव्यात. फाटलेल्या नोटा बँक ब्राँचमध्ये जाऊन बदलण्यासाठी कोणताही चार्ज किंवा शुल्क आकारलं जाणार नाही.
???? लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव विकोपाला गेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदी सरकारनं काही चिनी अ‍ॅप्सही बॅन केले होते. चीनच्या अ‍ॅपवर आणि डझनभर कंपन्यांवरील बंदीनंतर लष्कराच्या कॅन्टीनमध्ये यापुढे चीनमधून आयात केलेला माल विकला जाणार नाही.
???? तुमच्याकडे चारकाची किंवा दुचाकी वाहन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या कडे तर PUC सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे या सर्टिफिकेटची एक्सपायरी डेट संपली असेल तर ते रिन्यू करून घ्या. नाहीतर 10 हजारांचा दंड भरावा लागेल.
शेअर करा
Exit mobile version