Site icon सक्रिय न्यूज

केवड येथे तीन एक्कर मधील सोयाबीन जळून खाक…..!

केज तालुक्यातील केवड येथील शेतकरी मीराबाई मधुकर सत्वधर यांनी तीन एक्कर मधील मळणीसाठी काढून ढिगारा लावून ठेवलेले सोयाबीन मंगळवारी (दि.२७) संध्याकाळी 7.30 च्या सुमारास जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी विजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. सदरील घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरील आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. केज पोलिसात तक्रार दिली आहे.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version