केज दि.३ – धारूर (जि. बीड) येथील रहिवासी व सध्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रुपेश दिनेश उगले या विद्यार्थ्यांस लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असुन पुढील शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांस आर्थिक मदतीची गरज आहे. सदरील विद्यार्थ्यांस धारुर शहर व जिल्ह्यातील दातृत्व स्विकाणाऱ्या संस्था व व्यक्तींनी आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करत गतवर्षी निट परिक्षेत ५२७ गुण घेवून वैद्यकीय परिक्षेस रुपेश दिनेश उगले प्रवेशपात्र ठरला. मात्र रुपेशला पहिला फटका ७०:३० चा बसला. या नियमामुळे जास्त गुण असतानाही रुपेशला निमशासकीय कोट्यातून डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे शिक्षण घेण्याची वेळ आली. घरात अठरा विश्व दारिद्रय असताना समाजातील पतपेढी व काही दात्यांच्या मदतीमधून प्रथम वर्ष पुर्ण होत आहे. लॉकडाऊन मध्ये वडिलांच्या हातचे काम गेल्याने पतपेढीचे आठ महिन्याचे हप्ते थकले. पतपेढीच्या तकाद्यामुळे वडिलांना हृदयविकाराचा सामना करावा लागत आहे. अत्यंत बिकट परिस्थिती मुळे रुपेशला आर्थिक मदतीची गरज असुन समाजातील दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. दानशुर व्यक्तीनी रुपेश मो.न.8698313206 रुपेश दिनेश उगले SBI धारूर a/c 62489464181, IFSC SBIN0020032 यावर मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.