बीड दि.३ – राज्यात सर्वत्र कोरोना महामारी प्रादुर्भाव पाहता शाळा अजून ही बंद आहेत. तरीही, शाळा बंद शिक्षण सुरू, अंतर्गत विद्यार्थ्यांना रोज ऑनलाइन शिक्षणाचे धडे शाळा कॉलेजकडून दिले जात असताना या ऑनलाइन शिक्षणात दिवाळीची सुट्टी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धती वापरली जात आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही साहजिकपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतलेले दिसत आहेत. 15 जूनपासून राज्यातील शिक्षण विभागाने शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक वर्ष सुरू करून शिक्षण चालू ठेवले आहे. त्यामुळे दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर आला असताना शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे. त्या संबंधितांचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगिततर आहे.
दरम्यान ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणे गरजेचे असल्याने पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना व्हाट्सएपच्या माध्यमातून ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात स्वाध्याय दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.