बीड दि.४ – केज तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथील एका शिक्षकांने बँकेत भरणा करण्यासाठी मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेले चार लाख रुपयापैकी एक लाख ७० हजार रुपये चक्क बँकेच्या दारातूनच अज्ञात चोरट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना मंगळवार दि.३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:००वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथील शिक्षक देविदास गंगाधर कदम यांनी बँकेत भरणा करण्यासाठी चार लाख रुपये घरीहून मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवून मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास केज कळंब रोडवरील भारतीय स्टेट बंँकेच्या मोंढा शाखेत आले. त्यांनी आपली मोटारसायकल क्र.एम.एच.-४४-व्ही-८०२५ ही मोटारसायकल कळंब रोडवरील बँकेसमोर लावली.सदर
मोटारसायकलच्या डिक्कीत आणलेले चार लाख रुपायापैकी दोन लाख तीस हजार त्यांनी डिकीतून काढले व उर्वरित रक्कम एक लाख ७० हजार रुपये मोटारसायकल च्या डिकीत ठेवून बँकेच्या आत गेले. बँकेत दोन लाख ३० हजार रुपये भरणा केले व पैसे भरणा केल्यानंतर परत ते बँकेबाहेर लावलेल्या मोटारसायकल जवळ आले.परंतु त्यांना मोटारसायकलची डिक्की उघडी असल्याचे दिसून आले.तेव्हा त्यांनी पाहिले असता डिक्कीचे कुलूप कुणीतरी अज्ञात इसमाने तोडून डिक्कीत ठेवलेले एक लाख ७० हजार रुपये गायब झाले असल्याचे दिसून आले. देविदास गंगाधर कदम यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गु.र.न.४६८/२०२० कलम ३७९ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.काँ. रुक्मिणी पाचपिंडे या करीत आहेत.