Site icon सक्रिय न्यूज

”हे” नक्की करा अन्यथा…… तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो…..!

बीड – जगभरात अँड्रॉईडचे फोन सर्वाधिक वापरले जातात. ही ऑपरेटिंग सिस्टिम ओपनसोर्स असली तरीही ती गुगलची आहे. यामुळे बहुतांश अ‍ॅप ही गुगलचीच इन्स्टॉल असतात. असेच एक अ‍ॅप गुगल क्रोम ब्राऊझिंगसाठी वापरले जाते. या क्रोममध्ये मोठा बग सापडला आहे. यामुळे तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता असून गुगलने लवकरात लवकर अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे.

पुन्हा एकदा गुगलने अँड्रॉईड वापरणाऱ्यांना वॉर्निंग देत गुगल क्रोम ब्राऊजर अपडेट करण्यास सांगितला आहे. या अपडेटमध्ये झिरो-डे बगचा पॅच देण्यात आला आहे. हा एक महत्वाचा अपडेट असून असे न केल्यास तुमची माहिती चोरी केली जाऊ शकते. तसेच यामध्ये बँकिंग संबंधी माहितीही धोक्यात येऊ शकते.

सर्च इंजिन कंपनी गुगलने सांगितले की, क्रोम ब्राऊझरमध्ये असलेल्या बगच्या वापरातून युजरला नुकसान केले जाऊ शकते. मागच्या महिन्यात मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्येही अशाप्रकारचा बग सापडला होता. हा शोध गुगलच्याच सिक्युरिटी संशोधकांनी हा बग शोधला होता. गुगलने सांगितले की, क्रोम फॉर अँड्रॉईड ब्राऊझरसाठी सिक्युरिटी अपडेट रिलिज करण्यात आली आहे. क्रोमचे नवीन व्हर्जन 86.0.4240.185 रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये CVE-2020-16010 बग फिक्स करण्यात आला आहे.

शेअर करा
Exit mobile version