Site icon सक्रिय न्यूज

बिग बी अमिताभ बच्चन व सोनी टीव्ही विरोधात तक्रार दाखल……..!

लातूर | अभिनेते अमिताभ बच्चन तसेच सोनी वाहिनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलिसांना यासंदर्भात लेखी तक्रार दिली आहे.

मनुस्मृतीविषयी प्रश्न विचारुन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप अभिमन्यू पवार यांनी केला आहे.

‘कौन बनेगा करोडपती’च्या 30 ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या भागात बेजवाडा विल्सन आणि अनुप सोनी सहभागी झाले होते. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे वाद निर्माण झाला आहे.

धर्म म्हटलं की भारतात अनेक धर्म आहेत. त्यामुळे पर्यायांमध्ये चारही धर्म आले पाहिजे होते. पण विष्णूपुराण, श्रीमद्भगवद्गीता, ऋग्वेद, मुनस्मृती अशा फक्त हिंदू धर्मीयांशी निगडित धर्मग्रंथांचा उल्लेख करण्यात आला. बाकीच्या धर्मांच्या ग्रंथांचा समावेश पर्यायांमध्ये का केला नाही?, असा सवाल अभिमन्यू पवार यांनी विचारलाय.

शेअर करा
Exit mobile version